महिला दिनाचे औचित्त्य साधून वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्टच्या विद्यार्थिनींचा बॉक्स क्रिकेट मॅचमध्ये जोश

Mar 10, 2017 | Posted by admin in Campus Corner   No Comments »

वेलिंगकर  इन्स्टिटयूट  ऑफ मॅनेजमेण्टच्या ‘इम्पॅक्ट २०१७’ या बी-स्कूल्समधल्या क्रिकेटस्पर्धेची माटुंगा जिमखान्यावर धूम

महिला दिनाचे औचित्त्य साधून विद्यार्थिनींचा बॉक्स क्रिकेट मॅचमध्ये जोश


इन्व्हेस्टमेंट,स्ट्रॅटेजी ,ई -कॉमर्स असे  जगाच्या अर्थकारणाशी निगडीत गंभीर विषय शिकणाऱ्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचे क्रिकेटशी काय देणे-घेणे ? पण माटुंग्याच्या वेलिंगकर  इन्स्टिटयूट  ऑफ मॅनेजमेण्ट  (WeSchool )ने  गेली तब्बल २५ वर्षे ‘इम्पॅक्ट’ या आंतर बी-स्कूल  क्रिकेटस्पर्धेचे आयोजन करत  मुंबईतल्या सगळ्या  बी-स्कूल्सना वर्गातल्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडत मैदानावर  खेळायला उतरण्याची संधी मिळवून दिली आहे .या वर्षी ८-२३ मार्च दरम्यान होणाऱ्या  स्पर्धेत  दालमिया ,सिडनहॅम ,मेट ,इंडियन एज्युकेशन,लाला लजपतराय ,अथर्व ,ठाकूर आणि दुर्गादेवी सराफ अशी मुंबईतली नामांकित  बी -स्कूल्स  उतरली  आहेत ती ही सोनेरी ट्रॉफी जिंकून वाजत-गाजत घरी नेण्याच्या जिददीने , म्हणून या वर्षीची ‘इम्पॅक्ट’ मोठ्या अटीतटीची  होणार  हे नक्की !

हे स्पर्धेचे  रजत वर्ष म्हणून  माटुंगा जिमखान्यावर झालेल्या  उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून  मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू जतीन परांजपे, वेलिंगकरच्या स्थानिक कार्यकारी समितीआणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँडव्होकेट श्री. एस. के. जैन , समूह संचालक डॉ उदय साळुंखे आवर्जून उपस्थित होते.विशेष म्हणजे या तिन्ही मान्यवरांनी पिचवर प्रत्यक्ष उतरून हम भी कुछ कम नही असे म्हणत तरुणाईचा जोश चांगलाच वाढवला . पहिल्या दिवसाच्या तीन प्रमुख  मॅचेससाठी  मेट वि एसआयइएस,के जे सोमैया वि दालमिया आणि अथर्व वि लाला लजपतराय ही बी-स्कूल्स   मैदानात उतरली .त्यात मेट ,दालमिया आणि लाला लजपतरायनी पहिली फेरी जिंकून दमदार सुरुवात केली .दालमियाचा चिंतन  पंड्या (48 runs and 2 wickets) आणि  लालाचा  अक्षय ठाकूर  (97 runs in 48 balls , 2/18 in 4 hours)यांनी  ‘मॅन ऑफ द  मॅच ‘होण्याचा  बहुमान पटकावला.

माटुंगा जिमखान्यावर या मॅचेस जोरात सुरु असताना  वेलिंगकरमध्ये हेल्थकेअर ,बिझनेस ऍनालिटिक्स ,मीडिया -एंटरटेनमेंट अशा विविध प्रोग्रॅम्स मधल्या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे औचित्य साधत बॉक्स क्रिकेट लीग मध्ये  भाग घेऊन कॅम्पसमध्ये धमाल उडवून दिली . बॉक्स क्रिकेट खेळायला  कॅम्पसमध्ये  सेट केलेल्या खास पिचवर   त्या सगळ्या  उतरल्या होत्या ,त्यामुळे मुख्य मॅचेसबरोबर या  मॅचेसना चीअर अप करण्यासाठी कॅम्पसमध्ये  मोठी धमाल उडून गेली .बॉक्स क्रिकेटची ट्रॉफी वेलिंगकरमधल्या   मीडिया -एंटरटेनमेंट प्रोग्रॅमच्या टीमने जिंकून नेली

वेलिंगकर  इन्स्टिटयूटने   गेली तीन वर्षे इम्पॅक्टची ट्रॉफी जिंकून हॅट-ट्रिक  साधली आहे  . यावर्षी  मैदानात  मुंबईतली नामांकित  बी -स्कूल्स  उतरणार आहेत ती ही सोनेरी ट्रॉफी जिंकून वाजत-गाजत घरी नेण्याच्या जिददीने , म्हणून या वर्षीची इम्पॅक्ट अटीतटीची  होणार आणि शेवटी ढोल-ताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष होणार आहे तो  तरुणाईतल्या स्पोर्ट्समन स्पिरीटचा !

 

Leave a Reply

Copyright © 2017. All Rights Reserved. Designed by Singapore SEO SEO Blog  SEO Web Design  Mind Movies